महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; भिलारमध्ये महायुतीतच संघर्ष, तळदेव–कुंभरोशीत बहुरंगी लढती
पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांतील निवडणूक चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सर्वच गट-गणांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून उद्यापासून प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली सत्ता कायम राखणार की शिंदे…
गार्डन पंपहाऊस येथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; पाचगणीत उद्या शनिवारी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी यांच्या मार्फत शहर व परिसरात करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाणी पुरवठा कार्यालय परिसरातील गार्डन पंपहाऊस येथे ३०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनवरील गळती काढण्याचे तसेच नवीन पाईपलाईन जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सदर काम रात्री उशिरापर्यंत अथवा…
दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीचा पाचगणी-महाबळेश्वरात वावर.?; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीचा शोध सुरू असून, सदर आरोपी पाचगणी-महाबळेश्वर परिसरात वास्तव्य करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटनस्थळी काम करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्धापुर पोलीस स्टेशन, उपविभाग नांदेड ग्रामीण…
पाचगणीत शिवजयंतीच्या निमित्ताने जय्यत तयारी.. विविध कार्यक्रमांची होणार रेलचेल
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाचगणी शहरात यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सर्वत्र भगवा साज चढला आहे. तर शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण शिवभक्तांच्या बाईकला भगव्या झेंड्याची शिवमय झालर सजली आहे. शिवजयंती उत्सव समिती, पाचगणी व पाचगणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सोहळा…
पाचगणीत गुन्हेगारावर कडक कारवाई; भरत मालुसरेला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे (रा. गोडवली, पो. खिंगर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) याच्यावर कठोर कारवाई करत त्याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाचगणी पोलिसांचा हा महत्त्वाचा निर्णय…
जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आकाश उंबरकरची पुणे पोलिसात भरती; कासवंड गावाचा अभिमान उंचावला
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड या डोंगरकपारी वसलेल्या दुर्गम गावातील कु. आकाश हनुमंत उंबरकर या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे पोलिस दलात भरती होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशामुळे कासवंड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आकाश उंबरकर हा अतिशय सामान्य…
पोलिस असल्याची बतावणी करून जेष्ठ नागरिकाची लूट; पाचगणीत धक्कादायक प्रकार
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीमध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या एका जेष्ठ नागरिकाची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस असल्याची बतावणी करत दोन अनोळखी व्यक्तींनी ही चलाखीने लूट केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माधव गजानन बोधे हे नेहमीप्रमाणे सकाळी ८:४५ दरम्यान स्टँड परिसरातील साईबाबा मंदिरात…
पाचगणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तांब्याचे बंब व लोखंडी साहित्य चोरी प्रकरणी आरोपी जेरबंद, ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील विविध ठिकाणी तांब्याचे पाण्याचे बंब व बांधकामातील लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाचगणी पोलिसांनी अल्पावधीतच आरोपींना अटक करून सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पाचगणी पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार खिंगर (ता. महाबळेश्वर) दिनांक १८ ते १९ मार्च दरम्यान येथील गणेश सुरेश…
इनरव्हील क्लब पाचगणीचा उपक्रम; शाळेला क्रीडा साहित्य, अलेक्सा डॉल भेट, २०० विद्यार्थिनींची दंततपासणी
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सामाजिक बांधिलकी जपत इनरव्हील क्लब पाचगणी यांच्या वतीने नगरपालिका शाळा क्रमांक २, पाचगणी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेला क्रीडा साहित्य तसेच विद्यार्थिनींचे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी ‘अलेक्सा डॉल’ हे आधुनिक साधन भेट देण्यात आले. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आयोजित या कार्यक्रमात आरोग्यालाही प्राधान्य…
प्रतिकूलतेवर मात करत विक्रम पाडळे यांची एमपीएससीत ४२ वी रँक; कर सहाय्यक पदावर यश
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील रामवाडी येथील विक्रम दत्तात्रय पाडळे या जिद्दी युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत ४२ वी रँक मिळवून कर सहाय्यक पद पटकावले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही खचून न जाता चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले असून, रामवाडीच्या नावात पुन्हा एकदा…
भिलार – दानवली रस्त्यावर अल्पवयीनाकडून कोयत्याने हल्ला; सेवानिवृत्त नागरिक गंभीर जखमी
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :महाबळेश्वर तालुक्यातील दानवली परिसरात एका सेवानिवृत्त नागरिकावर अल्पवयीन मुलाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पाचगणीतील दानवली-भिलार रोडवरील ‘हॉटेल हाय 5’ समोर ही घटना घडली. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार भाऊसाहेब गेणु दानवले (वय वर्षे ६० ) यांच्यावर आरोपीने कोणताही…

